अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25
अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ
घेणेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि. 13 जुन 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना वसतीगृह व स्वाधार योजनेचे अर्ज करणेकरिता एकच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जाऊन नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगईन वर अग्रेशित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपुर्ण भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपुर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जवाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम दि. 16.09.2024 असून अर्ज करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल-https://hmas.mahait.org सदर योजनेच्या ठळक निकषामध्ये विद्यार्थी पात्र ठरत नसल्यास अश्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.