1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या अधिकारी/ जवान / विधवा यांच्याकरीता युध्द सम्मान योजना

1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या

अधिकारी/ जवान/विधवा यांच्याकरीता युध्द सम्मान योजना

 मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

          चंद्रपूर : युध्द सम्मान योजनेअंतर्गत सन 1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या  आणि समर सेवा मेडल / पुर्वी स्टार्स मेडल /पश्चिमी स्टार्स मेडल प्राप्त व्यक्ती किंवा त्यांच्या पत्नी (SSCOs/ECOs, Regular Commissioned Officers)   यांना केंद्रिय सैनिक कल्याण बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून एकरकमी 15 लाख रुपये ‘युध्द सन्मान योजना’  तयार करण्याचा  प्रस्ताव विचाराधीन आहे. ज्या माजी सैनिकांनी सन 1965 व 1971 च्या युध्दात भाग घेतलेला होता आणि डिर्स्चाज बुक मध्ये समर सेवा मेडल आणि पुर्वी स्टार्स मेडल/ पश्चिमी  स्टार्स मेडल मिळाल्याची नोंद आहे, अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 2 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावे .

अर्जासोबत सादर करावयाची  कागदपत्रे : माजी सैनिक/ विधवांच्या संपूर्ण डिस्चार्ज बुक व ओळखपत्रांची झेरॉक्स,   पेन्शन स्लीप, ज्यांचेकडे शेतजमीन आणि राहण्याकरीता घर आहे, त्याचा सरपंच/ ग्रामसेवक /तलाठी यांचा दाखला, मागील पाच वर्षाचे इंन्कम टॅक्स रिटर्नची छायाकिंत प्रत  किंवा इंन्कम टॅक्स २AS फार्म, सध्याचा उत्पन्नाच्या साधनाचा तपशिल व उत्पन्नाचा दाखला, नॉन पेन्शनर यांनी शासकीय पेंशन मिळत नसल्याबाबतचे  स्वयंघोषणापत्र.

उपरोक्त अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 2 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.