शासकीय वसतिगृह प्रवेशास मुदतवाढ

शासकीय वसतिगृह प्रवेशास मुदतवाढ

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

भंडारा दि. 29 – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृहामध्ये नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील एकुण 70 शासकीय वसतिगृहासाठी सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षा करिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी दि. ३० ऑगस्ट २०२4 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली होती. सदर प्रवेशासाठी आता 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

व्यवसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्यापही शैक्षणिक संस्था स्तरावरुन पुर्ण न झाल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तसेच कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहु नये याकरीता शासकीय वसतिगृहाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज भरण्याकरीता दि.16 सप्टेंबर, 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सन 2024-25 करीता व्यावसायिक अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून http://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. शासकीय वसतिगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशास दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावे असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.