मालेवाडा येथे संत निरंकारी मडळाचे रक्तदान शिबीर / 82 पुरूष व 4 महिला एकूण 86 यूनिट रक्तदान

मालेवाडा येथे संत निरंकारी मडळाचे रक्तदान शिबीर

रक्तदान परकारा द्वारे कर्माने ईश्वर भक्ती – किशन नागदेवे

82 पुरूष व 4 महिला एकूण 86 यूनिट रक्तदान

मुख्य संपादक,मिथुन मेश्राम 9923155166

मालेवाडा संत निरंकारी मंडळ, शाखा मालेवाडा च्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. या शिबीरात 82 पुरुष व 4 महिला असे एकूण 86 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे रक्त टंचाई झाल्यामुळे त्यांनी मंडळाला विनंती करताच मानवसेवे साठी संत निरंकारी मंडळा द्वारे तातडीने मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले.

शिबीराचे उ‌द्घाटन संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री किशन नागदेवे यांचे हस्ते श्रीमती गिताताई कुमरे, माजी जि.प. सदस्य, श्री हशिष निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, श्री कन्हैयालाल डेंगानी, श्री मोरे PSI, श्री धनगम PSI, श्री बोगा उपसरपंच, डॉ. उंदिरवाडे, श्री शेडमाके, श्री उमेश नंदनवार, श्री सुभाष गुंडरे, श्रीमती सुरेखा वनस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

उद्घाटन पर संबोधनात श्री किशन नागदेवे यांनी रक्तदान हे परोपकारा द्वारे कर्मा ने ईश्वर भक्ती असून या सत्कर्मा द्वारे रक्तदात्याला अंतर आत्माला जो समाधान मिळतो तो ईश्वराचा आर्शीर्वादच

आहे.

संत निरंकारी मंडळाद्वारे दरवर्षी जिल्हयातील वडसा, कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, आष्टी इ. शाखे मध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करून जवळपास 800-1000 युनीट रक्तदान केला जातो. मानव सेवेसाठी समर्पित संत निरंकारी मंडळा द्वो स्वच्छता इ. असे अनेक समाजसवेचे कार्य निस्वार्थ,

समर्पण भावनेने केले जातात.

मान्यवरांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यांत आले. रक्त संकलना साठी रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांचे सर्व चमू यांनी परिक्षम घेतले. शिबीराचे यशस्विते करिता ब्रांच – मालेवाडा मुखी श्री कृष्णा किंचक, सेवादल संचालक,, श्री कार्तीक धकाते व सर्व महीला पुरूष सेवादल सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शिबीराला यशस्वी केल्याबद्दल संत निरंकारी मंडळाचे शाखा – मालेवाडा कडून सर्वाचे आभार व्यक्त करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचालन श्री कृष्णाजी किंचक व आभार प्रदर्शन श्री कार्तीक यांनी केले.