कुंभकर्णाच्या झोपेत असनाऱ्यां शासनाला केव्हा जाग येणार – शा.वे.स. अध्यक्ष

कुंभकर्णाच्या झोपेत असनाऱ्यां शासनाला केव्हा जाग येणार – शा.वे.स. अध्यक्ष

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील प्रसिद्ध सर्वांत जुनी व पहीली शाळा ओळख असनारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाही या शाळेवरती मोठ संकट उभं आहे. या शाळेची इमारत सन 1950 या वर्षात बांधण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती सुद्धा केली गेली नाही. या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलीत आदीवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील कित्तेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक घडत आहेत मात्र आज अशा शाळेकडे शासन व प्रशासनाचे जाणिवपूर्वक पुर्णतः दुर्लक्ष केल आहे. छत गळायला लागलं आहे कवेलू फुटल्या आहेत स्लॅब चे पोपळे गळून एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडलं तर नक्कीच जिव जाण्याची शक्यता आहे. या संबंधाने प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला आहे परंतु महाराष्ट्रात शासनाला सस्ता स्थापन व इलेक्शन यातून वेळच मिळत नसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे असा गंभीर आरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाही चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम. बि. मेश्राम यांनी केली आहे.
सिंदेवाहीचे स्थानिक प्रशासनाने आमच्या हातात काहीही नाही म्हणत समस्येकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात अट्टेचाळीस तासांपासून सतत पावुस सुरू आहे परंतु स्थानिक किंवा जिल्हा प्रशासनाने शाळेची स्थितीची माहिती घेण्यातही तत्पता दाखविली नसल्याने काल शाळेतील पालक प्रशासन व शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते. काल शाळेत अध्यक्ष व पालकांनी बैठक घेतली तात्काळ कार्यवाही न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

वारंवार मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व प्रशासनाला समस्येबद्दल पाठपुरावा केला आहे मात्र आजतागायत निधी उपलब्ध करून दिलेली नाही. आणि नाईलाजास्तव पडक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं भीतीच्या वातावरणात शालेय शिक्षण घेत आहेत. सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. सरकार निद्रा अवस्थेत असून दोन वर्षापासून केलेल्या पाठपुरावाला केराची टोपली दाखवली आहे.
शासन व प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा शाळेला कुलूप लावु व होण्याऱ्या परिनामास सर्वस्वी जबाबदारी सरकार, पालकमंत्री, आमदार साहेब यांच्यावर राहील – अमोल कुचनवार उपाध्यक्ष, शा.वे.स

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक – १ असून आमचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहे शिक्षण घेत असताना शाळेची मोळकिळीस इमारत आली आहे त्यामुळे आमच्या मुलांच्या जीव धोक्यात आलेला आहे. शासनाने निधी उपलब्ध करून लवकरात लवकर नवीन इमारतीचे बांधकाम करून द्यावे – सुधीर ठाकरे, पालक

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची ईजा किंवा जिवीत हाणी झाल्यास उत्तर देण्यास प्रशासनाने तयार रहावे – प्रकाश मेश्राम, पालक