पिक विमा योजनेत शेत नुकसानी ची माहिती द्या 72 तासात विमा  कंपनीचे प्रतिनिधी कार्यरत

पिक विमा योजनेत शेत नुकसानी ची माहिती द्या 72 तासात विमा  कंपनीचे प्रतिनिधी कार्यरत  

          भंडारा, दिनांक 24-प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगाम 2024-25 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पुर्वसूचना विमा कंपनीस देणेबाबत. खरीप हंगाम 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात राबविली जात आहे.

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखीमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. (शासन निर्णयानुसार भात पिक हे जलप्रिय असल्यामुळे संरक्षित क्षेत्र जलमय होणे म्हणजेच Inudation हि धोक्याची बाब भात पिकासाठी लागु होत नाही. )

माहे जुलै महिन्या मध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याने निदर्शनास येत आहे. जिल्हयात पिक विमा संरक्षण घेतलेली अधिसूचित पिके भात व सोयाबीन यांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्व सूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहीत मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पिक व बाधित क्षेत्रा बाबत घटना घडल्या पासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंस ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्रि क्रमांक / बँक / कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवितांना पिक विमा अर्ज क्र., सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल.

याबाबत अधिक तपशिला साठी तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आणि पिक विमा कंपनी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

भंडारा जिल्हासाठी Chola Mandalam Gen. Insu. Company Ltd. ही विमा कंपनी असून कंपनीचा टोल फ्रि क्रमांक आहे-14447

कंपनी ई-मेल आय डी- customercare@cholams.murugappa.com

विमा कंपनीचे जिल्हयाचे व तालुक्याचे प्रतिनीधी खालील प्रमाणे आहेत

S. No

विमा कंपनीचे नाव

जिल्हा

तालुका

जिल्हा /तालुका कार्यकारिणीचे नाव

पदनाम

मोबाईल नंबर

ई – मेल आयडी

 

1

चोला मंडलम जनरल इंन्शुरंस कंपनी

भंडारा

भंडारा

निखिल गजानन लोणेरे

जिल्हा प्रतिनिधी

9764790288

nikhillonare59@gmail.com

 

2

 

 

साकोली

रोहित सुरेश कापगते

तालुका समन्वयक

7499739534

rohitkapgate11@gmail.com

 

3

 

 

लाखांदूर

आकाश उत्तम चेटुळे

तालुका समन्वयक

7030647636

akashchetule4@gmail.com

 

4

 

 

पौनी

अतुल बिहारी फुलले

तालुका समन्वयक

9404318956

borkarsumit62@gmail.com

 

5

 

 

भंडारा

अतुल सावदेव नागदेवे

तालुका समन्वयक

9545968096

atnagdeve0123@gmail.com

 

6

 

 

तुमसर

धीरज सुनील भोस्कर

तालुका समन्वयक

8329721490

dhirajboshkar786@gmail.com

 

7

 

 

मोहाडी

कार्तिककुमार बुधाराम फन्ने

तालुका समन्वयक

9766708622

kartikfunne@gmail.com

 

8

 

 

लाखनी

संदिप विलास खानडेकर

तालुका समन्वयक

9022880986

sandipkhandekar@gmail.com