मुलानेच केला वडिलाचा खुन 

मुलानेच केला वडिलाचा खुन 

दिनांक २२/०७/२०२४ रोजी पोलीस ठाणे सिंदेवाही हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंन्द्र तलांडे यानी फोनवरूण श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांनी माहीती दिली. की आंबेडकर चौक वार्ड क २ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा वासेरा. यांनी आपल्या वडीलाला मारहान करूण गंभिर जख्मी केली आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

या माहीती वरूण सपोनि तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांनी तात्काळ . पोलीस ठाणचे सपोनि स्थुल, पोउपनी सागर महल्ले, पोहवा विनोद बावणे पो. अंमलदार रणधिर मदारे यांचेसह तात्काळ वासेरा गावासाठी रवाना झाले. परंतु प्रशासनाने दोन दिवस रेडअर्स्ट घोषीत केला होता. संततधार पाउस असल्याने वासेरा गावाकडे जाण्याचे सर्व रस्तें व पुलावरूण पाणी वाहत असल्याने सर्व रस्ते बंद होते त्या मुळे पोलीसांन समोर घटनास्थळी पोहचण्याचे मोठे आव्हान होते. परंतु अथक प्ररीश्रम व पोलीस मित्र व आपत्ती व्यवस्थापन चे सहकारी यांच्या मदतीने वाकल ते जामसाळा मध्ये असलेला शेतीतील नाण्याला असलेल्यां कमरेच्यावर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळा पर्यंत पोहचुन पुढील प्रवास ट्रॅक्टरच्या मुंड्यावर बसुन घटनास्थळ गाठले.

पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना तात्काळ पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीने त्याच मार्गाने ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे पोहचविण्यात आले तेथे डॉक्टारांनी तपासुण मृत घोषीत केले सदर घटने संबधाने मृतक यांची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही . पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की, मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करायचे आहे. तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाचे पत्नीने त्याला ५.०० रू दिले व ज्याचे उसने पैसे घेतले त्याला दे असे सांगितले. मृतकाने त्यातील ४०० रू देवुन १००饥 स्वताकडे ठेवुन घेतले. त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाउ कैकाडु रामटेके यांचे सोबत मृतकाच्या पत्नी समोर बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येवुन मृतकास तु घरी दारू पिण्याकरीता पैसे का मागतोस. तुला दारू पिण्याची सवय आहे तर तु दारू पिवुनं चुपचाप का झोपत नाही, असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला व झागडा भांडण होवुन आरोपीने मृतकास हाताबुक्यानी माहाण करूण खाली पाडले. त्यानंतर मृतक उठुन मनोज रामटेके यांचे घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाणे ठार मारण्याचे उद्देषाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकुन मारल्याने मृतकाचे कानाचे मागिल बाजुस डोक्यावर लागुन गंभिर जख्मी झाले. ग्रामीण रूग्नालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनी केली असता त्यांनी मृत घोषीत केले अशा तकारीवरूण मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा वासेरा याचेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपीतास तात्काळ पोलीसांनी ताब्यात घेतले असुंन पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत

सदर कामगिरी श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु, अपरं पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्री शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात तुषार चव्हाण ठाणेदार सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थुल, पो. उपनि सागर महल्ले, । अनिल चांदोरे, सफौ विनोद बावणें, रणधीर मदारे, सुहास करमकर, मोहित मेश्राम यांनी केली आहे