जिल्हाधिका-यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट

जिल्हाधिका-यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट

चंद्रपूर, दि. 22 : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी गिरगाव (ता.नागभीड) येथील चंद्रपूर ॲग्रो प्रोसेसर्स शेतकरी उत्पादक कंपनीच्या टीपीएच राईस मील उपप्रकल्पाला आणि कृषकोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीच्या टीपीएच सॉर्टिंग ग्रेडींग उपप्रकल्पाच्या बांधकामाना भेटी दिल्या.

यावेळी जिल्हाधिका-यांनी कंपनीमार्फत सुरु असलेल्या इतर उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कंपनीच्या सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करून उर्वरीत काम त्वरित पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. तसेच उपस्थित महसूली अधिकारी व विविध विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजनांच्या कामकाजास गती देण्याचे निर्देश दिले. तालुक्यात सूरू असलेल्या महसूल, जमाबंदी व पीकपाहणी या कामकाजाबाबतही जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीत निवडणूक आयोगाकडून सूरू असलेल्या मतदारयादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी अचूक करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के, नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे, उपविभागीय कृषी अधिकारी स्वाती घुले, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ गणेश मादेवार, मंडळ अधिकारी रंजना ढोले, मंडळ कृषी अधिकारी प्रिया शिंदे, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.