नागरिकांना शासकीय दराने वाळू उपलब्ध करून द्या

नागरिकांना शासकीय दराने वाळू उपलब्ध करून द्या.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे

             भंडारा, दि. 22: महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून नवीन वाळू धोरण दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झाले असून सदर धोरणाचे अनुषंगाने, दिनांक 19 जुलै 2024 रोजी मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचे अध्यक्षतेखाली, मा.खासदार डॉ.प्रशांत पडोळे, भंडारा-गोंदिया व मा.अपर जिल्हाधिकारी भंडारा, यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सुधारीत वाळु निर्गती धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

        नवीन वाळू धोरणात दिलेल्या निर्देशानुसार सामान्य नागरिक, घरकुलधारक, शासकीय बांधकाम व इतर बांधकाम व्यावसायिक या सर्व घटकांना वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आलेली असून यावर्षी 3,17,856 ब्रास वाळूसाठा भंडारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

          महाराष्ट्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले नवे वाळू धोरण ना नफा ना तोटा या तत्त्वावर असल्याकारणाने भंडारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 19 वाळू डेपो मधून वाळू विक्रीच्या किमती डेपो निहाय वेगवेगळ्या असतील.

अ.क्र.

तालुका

डेपोचे नाव

नागरीकांकरीता वाळु विक्रीचा दर रुपये प्रती (ब्रास)

1.

तुमसर

लोभी

₹ 1920/-

2.

चारगाव

₹ 1042/-

3.

सोंडया

₹ 2004/-

4.

मांडवी

₹ 2004/-

5.

आष्टी

₹ 1920/-

6.

मोहाडी

निलज बु.

₹ 1617/-

7.

मोहगाव देवी

₹ 2045/-

8.

कान्हळगाव

₹ 890/-

9.

मुंढरी बु.

₹ 875/-

10.

पवनी

गुडेगाव

₹ 1662/-

11.

भंडारा

बेलगाव

₹ 1914/-

12.

कोथुर्णा

₹ 1802/-

13.

लाखांदुर

मोहरना

₹ 1982/-

14.

खोलमारा

₹ 1298/-

15.

आंतरगाव

₹ 1124/-

16.

लाखनी

पळसगाव

₹ 1280/-

17.

वाकल

₹ 1417/-

18.

साकोली

परसोडी

₹ 1073/-

19.

खंडाळा

₹ 1250/-

या किमतीमध्ये स्वामित्वधन शुल्क (₹ 600 प्रती ब्रास), जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (स्वामित्वधनाच्या 10%), सिस्टीम इंटिग्रेशन चार्जेस (₹ 16.58 प्रति ब्रास) यांचा देखील समावेश आहे.