तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्यावर कार्यवाही
भंडारा,दि.17 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोटपा 2003 ची अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम,मुख्याधिकारी नगर परिषद,यांच्या मार्गदर्श्नाखाली आज 16 जुलै,2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग सामान्य रुग्णालय भंडारा पोलीस विभाग,यांच्या सयुक्त विद्यमानाने लाखनी तालुक्यातील शाळेच्या १०० मिटर आवारात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या पाणटपरीवर कार्यवाही करण्यात आली तसेच 200 रुपये दंड याप्रमाणे २९ पानटपऱ्यांवर कार्यवाही करुन एकुण रु.5650/- दड वसुल करण्यात आले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातर्गत कोटपा कायदा 2003 ची बुकलेट देवून जनजागृती करण्यात आली. तसेच कोटपा कायदा २००३ च्या कलम नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी, कलम –5 नुमार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष जाहिरातीवर बंदी, कलम-6 (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे दडनिय गुन्हा तसेच कलम)-6 ब शैक्षणिक संस्थाच्या परिसरात तबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी या नियमाची माहिती देवून तंबाखू विक्रेत्याना जनजागृती करण्यात आली
शाळेच्या १०० मिटर परिसरात तबाखूजन्य पदार्थाची विक्री केल्यास शाळेतील मूल आकर्शित होवून व्यसनाकडे आकर्शिले जातात.आाणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शरिरावर हानिकारक होत असतो.यावर कार्यवाही यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे राष्ट्रीय तंबाखू नियत्रण या कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ शैलेष कुकडे, श्रीमती आरती येळणे, सामाजिक कार्यकर्ता, कु कीर्ती बन्सोड, कार्यक्रम सहाय्यक, श्री. अंकुश पुराम , पालिस नायक एल सी बी.भंडारा, यांनी सहकार्य करुन मोलाचे योगदान दिले.