उद्योजकांसाठी ८ जुलै रोजी कार्यशाळा

उद्योजकांसाठी ८ जुलै रोजी कार्यशाळा

                भंडारा  : राज्यासाठी महत्वपुर्ण योगदान देणा-या एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठया प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत.

           सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबधित सर्व विभागाच्या सहकार्याने “IGINTE MAHARASHTRA-2024” या अंतर्गत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणेबाबत मा. विकास आयुक्त (उद्योग) यांचे निर्देशास अनुसरून दिनांक ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी, भंडारा यांचे अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे सकाळी 10.30 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये व्यवसाय सुलभीकरणा करिता मैत्री विभाग, मुंबई, निर्यातीकरिता DGFT नागपूर, भांडवला करिता SIDBI/IDBI, तसेच यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्हयातील उद्योजकांनी कार्यशाळेस उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे.