संपूर्णत: अभियानाचा गडचिरोलीत होणार प्रारंभ

संपूर्णत: अभियानाचा गडचिरोलीत होणार प्रारंभ

गडचिरोली,दि.04 : निती आयोग आकांक्षित जिल्हा/तालुका कार्यक्रमातंर्गंत सहा निर्देशकांचा संपूर्णत: अभियानांचा प्रारंभ शुक्रवार जुलै 2024 सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते होणार आहे.
या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा व भामरागड या 3 तालुक्याची निवड झालेली आहे. अभियानांतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण इत्यादी विकास क्षेत्रातील विविध 39 निर्देशांक उचावण्यास भर दिला जणार आहे. यापैकी 6 निर्देशकांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने निती आयोगामार्फत 4 जुलै, ते 30 सप्टेंबर दरम्यान संपूर्णत: अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी आय.टी.आय. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे.