वसतिगृहासाठी प्रवेश सुरु आहे विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा

वसतिगृहासाठी प्रवेश सुरु आहे विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा

        भंडारा,दि.4: राज्यातील ओबीसी विद्याथ्यांसाठी ३६ जिल्हयांमध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने हिवाळी अधिवेशनात केल्याप्रमाणे राज्यातील जिल्हयात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह सुरु करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ओबीसी कल्याण विभागाने पत्र काढून विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता ऑफलाईन अर्ज मागविले आहेत. ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी हे या वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करु शकतात.

सदरहु प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ते विनामूल्य देण्यात येतील.

अर्ज खालील अटी शर्तीचे अधिनतेवर देण्यात येतील.

मूळ भंडारा शहर येथील रहिवासी विद्यार्थ्याला वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज घेता येणार नाही. विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.अर्ज घेतेवेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक मूळ / साक्षाकित प्रत (मार्कशिट, टी.सी., जात प्रमाणपत्र, जात,वैधता प्रमाणपत्र) घेऊन येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला इयत्ता १२ वी चे परिक्षेत ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. ४ ५. पालकाची उत्पन्न मर्यादा २.५ लाख असावी.

अर्जदार हा इमाव, विजाभज, विमात्र, आर्थिक मागास प्रवर्गातील असावा. अर्जदार हा व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम घेणारा असावा.वसतिगृहातील १०० जागांचे आरक्षण खालीलप्रमाणे राहील. वसतिगृहनिहाय रिक्त जागांमध्ये इतर मागासवर्गाकरिता ५८ जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती ३३, विशेष मागास प्रवर्ग ०६, ई डब्ल्यु एस ४, दिव्यांग ४, अनाथ २ तर खास बाबीसाठी ५ अशा प्रत्येक वसतिगृहात १०० जागा राहणार आहेत.

विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वरील १ ते ७ अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज संपूर्ण कागदपत्रांच्या झेराक्स प्रतीसह सहाय्यक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन भंडारा येथे सादर करावेत.असे आवाहन सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण भंडारा.विभागानी कळविले आहे.

वेळापत्रक खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

वेळापत्रक  अर्ज वाटप व स्वीकारणे 1 ते 21 जुलै,2024 पर्यत

पहिली निवड यादी प्रसिद्ध करणे  30 जुलै,2024

पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 10 ऑगस्ट,2024

दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध 16 ऑगस्ट,2024

दुसऱ्या यादीमधिल विद्यार्थ्यांना प्रवेश देणे  20 ऑगस्ट,2024