जिल्ह्यात स्टॉप डॉयरिया मोहिमेची अंमलबजावणी करावी – विवेक जॉनसन
अतीसार थांबवा याबाबत 1 जुलै ते 31 ऑगष्ट पर्यंत अभियान
चंद्रपुर : 3 पावसाळयाच्या दिवसांमध्ये अनेक ठीकाणी साथीचे रोग पसरतात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्रास होतो त्याकरीता शासनातर्फे “डायरीया की रोमथाम , सफाई और ORS से रखे अपना ध्यान” असे ब्रीदवाक्य असलेले अतीसार थांबवा, या बाबत अभीयान जिल्हापरिषद चंद्रपुर तर्फे 1 जुलै ते 31 ऑगष्ट या कालावधीत टप्पेनिहाय पध्दतीने राबविण्यात येत आहे. विविध विभागांचा समन्वय साधुन अतीसार वाढीस लागण्यापुर्वी त्याचे व्यवस्थापन करण्याकरीता विशिष्ट बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक असुन,जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी जिल्ह्यात स्टॉप डॉयरिया मोहिमेची अंमलबजावणी करावी . असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.
जिल्हयातील शाळा, अंगणवाडया ,प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक शौचालय कार्यात्मक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील शाळा, अंगणवाडया , प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक र्शाचालयांलयांमध्ये 24 तास पाण्याच्या उपलब्धते बाबत खात्री करण्यात यावी व उपलब्ध पिण्याच्या पाण्याच्या तपासणीबाबत आराखडा तयार करण्यात यावा.जिल्हा व तालुकास्तरावर अतीसार व्यवथापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे . सदर कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना सहभाग नोंदविण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. जिल्यातील शाळा, अंगणवाडया , प्राथमिक आरोग्य केंद्र व समुह केंद्रामध्ये FTK व्दारे पाणी गुणवत्ता तपासणी करयात यावी . दुषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत. स्थानीक पातळीवरील नागरीक , संस्था आणि सरकारी कर्मचारी यांना पाणी व्यवथापन , पाणी गुणवत्ता स्वच्छता व आरोग्य या बाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. गावपाळीवर पाणी समितीची स्थापना व बळकटीकरण करुन, समितीव्दारे गावपाळीवरील पाण्याचे स्त्रोत , स्वच्छ्तेबाबत सुविधा याबाबत व्यवस्थापन करण्यात यावे. स्वच्छता दर्जा राखण्याच्या प्रक्रियेमध्ये गावपातळीवरील नागरीकांचा समावेश असल्याची खात्री करण्यात यावी, पाणी स्वच्छता आरोग्याचे महत्व आणी त्याचा जनमानसावर परिणाम याबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी अभियान आयोजीत करण्यात यावे. गावातील हातपंप तपासणी करण्यात यावी व तपासणीमध्ये आढळुन आलेले नादुरुस्त हातपंप दुरुस्त करुन घेण्यात यावेत. पंचायत समितीमधील सदस्यांसह गावामध्ये प्रभात फे-या काढुन घरगुती शौचालयांचे बांधकाम व वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी याबाबत राज्यस्तरावरुन सुचविण्यात आले आहे.त्यानुसार संबधीत यंत्रणेला अभियान यशस्वी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.