मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी  

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

मराठा, कुणबी मुला-मुलींसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यामार्फत “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2024-25” करिता 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाकरिता (पीएचडी)  क्युएस जागतिक मानांकन क्रमवारीत 200 च्या आत असणाऱ्या व परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभागांतर्गत ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 अंतिम मुदत असून जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. या योजनेविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.