जिल्हास्तर सुब्रतो फुटबॉल क्रीडा स्पर्धा  ५  ते ८ जुलै  दरम्यान

जिल्हास्तर सुब्रतो फुटबॉल क्रीडा स्पर्धा  ५  ते ८ जुलै  दरम्यान

          भंडारा दि.01 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय  पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे वतीने दि. 05 ते 08 जुलै 2024 या कालावधीत जिल्हास्तर सुब्रतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात येत आहे.

तरी भंडारा जिल्हयातील सर्व शाळा / महाविद्यालय / यांनी सदर कार्यक्रमाची नोंद घेवून जास्तीत जास्त् सहभाग दि.04 जुलै, 2024 रोजी 02.00 वाजे पर्यंत http://dsobhandara.co.in/admin/login/php या ऑनलाईन साईटवर आपला प्रवेश नोंदवावा (स्पर्धेदरम्यान ऑनलाईन प्रवेश यादी व ओळखपत्र असणे अनीवार्य आहे) असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती. लतिका लेकुरवाळे, यांनी आवाहन केले आहे. व अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे संपर्क साधावा.