मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

                भंडारा येथील ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक,कारधा यांनी एक अनोळखी  पुरुष 30 ते 35 वयोगटातील पुरुष हा मृत अवस्थेत आढळून आल्याने पोलिस स्टेशन ग्रामीण कारधा जिल्हा भंडारा येथे नोंद असून पुढील प्रक्रिया तपासावर आहे.

           त्या मृतकाचे रंग- सावळा, उंची 5 फुट 5 इंच, चेहरा गोल व मध्यम बांधाचा, अंगात निळसर रंगाचा फुल बाहयाचा शर्ट,व दोन्ही हाताना फोड केलेले, बनियान हिराव्या रगाची, कथीया काळपट रंगाचा पॅन्ट घातलेला त्यावर काळया रंगाचा चामडयाचा बेल्ट, व काळया रंगाची माचो कंपनीची अंडरवियर व केस आखुळ कळे, उजव्या हाताचे मनगटाला काळया रंगाचा दोर बांधलेला असल्याचे 18 जून,20 24 रोजी 5.00 वाजता पुर्वी वैनगंगा नदीचे पाण्यात मरण पावलेला अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. कारधा येथे मर्ग क्रमाक 29/24 कलम 174 जा. फौ. चा नोंद असुन तपासावर आहे.असे पोलीस निरीक्षक,पोलिस स्टेशन कारधा यांच्या संपर्क-साधावा- क्र. 9404857931,7768961412 पोलीस नियंत्रण कक्ष-07184-252400 पो.हवा. रणधीर डोंगरे ब.नं. 6747020266529