संकटग्रस्त व अत्याचारग्रस्त महिलांसाठी महिला निवासी संस्था आशेचे किरण

संकटग्रस्त व अत्याचारग्रस्त महिलांसाठी महिला निवासी संस्था आशेचे किरण

चंद्रपूर : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिजामाता महिला वर्किंग वूमन हॉस्टेल, स्वाधार निवास गृह शक्तिसदन आणि सखी वन स्टॉप सेंटर या महिला निवासी संस्था चालविण्यात येत आहेत.

सखी वन स्टॉप सेंटर : ही येाजना जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात राबविली जात असून सखी वन स्टॉप सेंटर अंतर्गत मोफत आश्रय, वैद्यकीय सुविधा, कायदे विषयक मदत, समुपदेशन, रेस्क्यू सुविधा, पोलिसांची मदत पुरवली जाते. सखी वन स्टॉप सेंटर येथे आश्रय पाच दिवसांचा असतो व त्या पाच दिवसामध्ये पिडीत लाभार्थीला वरील सर्व सुविधा पुरविल्या जातात व महिलांचे  पुर्नवसन करण्याचे प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे हे केंद्र 24 बाय 7 सुरु असते. सोबतच महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 वर या सेंटरद्वारे सेवा दिली जाते.

स्वाधार निवासगृह/ शक्तिसदन :  या योजने अंतर्गत जिल्हयात महिलांना मोफत निवास सेवा, समुपदेशन सेवा आणि प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य होत असून जिल्हयातील सरस्वती शिक्षण महिला मंडळ चंद्रपूर या संस्थेद्वारे ही सेवा दिली जात आहे. कौटुबिंक कलहाने बाधित तसेच निराश्रीत महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

            जिजामाता महिला वर्किंग वूमन हॉस्टेल :  या योजने अंतर्गत नौकरी करणाऱ्या व तांत्रिक शिक्षणासाठी चंद्रपूर शहरात राहणाऱ्या महिलांना राहण्यासाठी वस्तीगृहात माफक दरात उत्तम सोय उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा सर्वोदय महिला मंडळ द्वारे संचलित कली जाते.

जिल्हा महिल व बालविकास अधिकारी कार्यालयअंतर्गत कार्यरत वरील सर्व संस्थांचा लाभ जिल्हयातील महिलांना घेता येणार असून पिडीत, निराधार आणि कौटुंबिक  आधार नसलेल्या महिलांना वरील दोन्ही संस्था तर शहरात नोकरी निमित्त राहणाऱ्या महिला कर्मचारी यांच्यासाठी, जिजामाता महिला वर्किंग वूमन हॉस्टेल या संस्था अंतर्गत सेवा दिली जाते. जिल्हयातील नागरिकांना तिनही संस्थांना भेट द्यावी आणि ओळखीत गरजू महिला असेल तर त्यांना 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने केले आहे.