खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना घेतला आढावा 

खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना घेतला आढावा 

              भंडारा दि.19 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी, भंडारा कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांनी जिल्हयात सुरु असलेले प्रकल्प व जिल्हा विकास आराखडयाची विस्तृत माहिती दिली.

         जिल्हयातील अधिका-यांनी जिल्हा विकास आराखड्यात समाविष्ट बाबी व त्यांच्या विभागातील योजनांची माहिती दिली. खासदार महोदयांनी सर्व बाबी जाणुन घेतल्या. त्यांनी जिल्हयाचा विकास करण्याचे अनुषंगाने अनेक सुचना केल्या. या बैठीच्या वेळी मुख्यत्वे श्री राहुल गवई, उपवनसंरक्षक, श्रीमती आयेशा पठाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी, श्री श. क. बोरकर, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी श्री बोरकर, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी  खासदार श्री.पडोळे व उपस्थितांचे आभार मानले.