भंडारा व गोंदिया क्षेत्रातील नोंदणीकृत पत्रकारांनी 13 ते 16 जून,पर्यत आवेदन स्विकारण्यात येतील असे उपसंचालक साकोली विभागाचे आवाहन

भंडारा व गोंदिया क्षेत्रातील नोंदणीकृत पत्रकारांनी 13 ते 16 जून,पर्यत आवेदन स्विकारण्यात येतील असे उपसंचालक साकोली विभागाचे आवाहन

              भंडारा, दि.12 :भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या नोदणीकृत पत्रकारासाठी वन व वन्यजीव  विषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याचे करण्यात आले असून 18 जून,2024 भंडारा जिल्हातील पत्रकारांसाठी व  19 जून,2024 रोजी गोंदिया जिल्हयातील पत्रकारांचे  दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

           त्याअनुषंगाने वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुक पत्रकारांनी 13 जून, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते  16 जून, 2024 सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत भंडारा व गोंदिया जिल्हयातील पत्रकारांकडून आवेदन स्विकारण्यात येतील. त्याकरीता प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याकरीता सदर आवेदन फार्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत  QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            त्यासाठी  वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौरा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भंडारा -गोंदिया जिल्हयातील सर्व इच्छुक पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. विशेष माहिती करीता www.nawegsonnazira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.असे आवाहन उपसंचालक नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली या विभागानी कळविले आहे.