शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री आपल्या नावाची नोंदणीला 20 जून पर्यत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री आपल्या नावाची नोंदणीला 20 जून पर्यत मुदतवाढ

              भंडारा,दि. 12 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान/ भरडधान्य (मका)  करिता ऑनलाईन नोंदणी  31 मे, 2024 अखेर मुदत देण्यात आली  होती. भंडारा जिल्ह्यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही ऑनलाईन शेतकरी नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार धान/ भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला दि.20 जून 2024 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            तरी शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या केंद्रावर जाऊन करावी व त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा (चालू हंगामाचा पिकपेरा असलेला), नमुना 8 अ, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करता येईल. शेतकरी बाधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी नजिकच्या शासकिय धान/ भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्थांकडे कागदपत्र सादर करुन रब्बी हंगाम 2023-24 धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.