अनु.जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध

अनु.जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध

या योजनेचा लाभ घ्यावा,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाचे आवाहन

            भंडारा, दि. 12 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमीत्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउ‌द्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना आणली आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यतील अनुसुचित जाती व नवबौध्द घटाकातील 18 वर्षावरील नवउ‌द्योजक यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित सबसिडी च्या अनुषंगाने नवउ‌द्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. यासाठी प्रकल्प कर्ज मंजुर पात्र इच्छुक नवउ‌द्योजकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क साधाव. असे आवाहन बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा  विभागानी कळविले आहे.