जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शाळेचा निकाल १०० टक्के  

जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शाळेचा निकाल १०० टक्के  

            भंडारा,दि.11 : जवाहरनगर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी राजेदहेगाव येथील विध्यार्थीनिनी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही सर्वोत्तम यश प्राप्त केले.

            यावर्षी एकूण ३६ विध्यार्थीनी परीक्षेला प्रविष्ट झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये प्रथम कु. अंजली अर्जुन मेश्राम ८९.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येणाचा मान मिळवला आहे. द्वितीय क्रमांककु. प्रणिता परमानंद लोखंडे  ८९.०० टक्के तर तृतीय क्रमांक कु.आसावरी रमणकुमार मेश्राम ८७.४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. प्राविण्य श्रेणीत २८ प्रथम श्रेणीत ७ व द्वितीय श्रेणीत १ विध्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

       या सर्व प्राविण्य प्राप्त उतीर्ण विध्यार्थिनीचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर, बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा, नरेंद्र मेंढे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील इयता सहावीत प्रवेश प्रात्र विध्यार्थीनीच्या पालकांना निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले.