मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज आमंत्रित सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण विभागाचे आवाहन 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज आमंत्रित सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण विभागाचे आवाहन                                                                                                                                                 राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितोत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवणेकरिता सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॅड, स्टिल व्हील चेअर फोल्डींग वॉकर, फोल्डींग वॉकर कमोड खुची, नि-ब्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर ही साधने उपकरणे खरेदी करता येतील त्याकरीता सन 2024-25 या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता ऑफलाईन  अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावे.

Ø  आधार कार्ड / मतदान कार्ड

Ø  राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स आधार संलग्न)

Ø  पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

Ø  स्वयं घोषणापत्र

Ø  शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली कागदपत्रे

Ø  उत्पन्न् दाखला (वार्षिक उत्पन्न 2 लाखापर्यंत) इत्यादी. कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन, जि. प. चौक, भंडारा या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, भंडारा या विभागानी कळविले आहे.