८४ हजारहून अधिक  बालकाची होणार अतिसार तपासणी अतिसार नियंत्रण पंधरवाडा ६ जून ते २१ जून

८४ हजारहून अधिक  बालकाची होणार अतिसार तपासणी

अतिसार नियंत्रण पंधरवाडा ६ जून ते २१ जून

 देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकाच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि ह्या बाल मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन राज्यामध्ये दिनांक ६ जून ते २१ जून या कालावधीमध्ये विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा (Intensified Diarrhea Control Fortnight) राबविण्यात येतो.

            भंडारा जिल्ह्यात २०२३ मध्ये एकूण २३६३ बालकांना व प्रौढांना अतिसाराची लागण झाली व त्यामध्ये एकही मृत्यूची नोंद नाही. या वर्षी भंडारा जिल्ह्यातील ८४८११ बालकांना आशा कार्यकर्ती मार्फत मोहीम काळात घरोघरी भेट देऊन बालकाची अतिसारासाठी तपासणी करणे व अतिसार झालेला असल्यास जलसंजीवनी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे जलसंजीवनी व झिंक टॅबलेटचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

 अतिसार हा जलजन्य आजारामध्ये मोडतो. विविध प्रकारच्या विषाणू ,जिवाणू तसेच परजीवी तसेच या मुळे आजार होतो. जलजन्य आजारामध्ये अनेक प्रकार आहेत जसे कि कॉलरागॅस्ट्रोअतिसारहगवण यापैकी कॉलरा हा  व्हिब्रिओ कॉलरा या विशिष्ट जिवाणूमुळे होतो.

           प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्यानंतर उलट्याही होतात. कॉलरा मध्ये पाण्यासारखे / भाताच्या पेजेसारखे जुलाब होतात. या आजारामध्ये शरीरातील पाणी अत्यंत वेगाने कमी होते. त्यानंतर गॅस्ट्रो  हा आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू ,विषाणू मुळे होतो या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी होतात.अतिसार हा आजार जिवाणू व विषाणू मुळे होतो या आजारात प्रामुख्याने जुलाब होतात. हगवण  हा आजार परोपजीवी जंतू आमांश (अमिबा ) मुळे होतो.या आजारात पोटात दुखते व रक्तमिश्रित जुलाब सुरु होतात. या सर्व आजाराचा अधिशयन काळ हा जंतूने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसून येऊपर्यन्त असा आहे. (काही तास ते ५ दिवस असा) या आजारावर वेळीच योग्य उपचार होणे गरजेचे आहे नसता जीवालाही धोका होऊ शकतो.

        बालकाला अतिसार झाला आहे हे तुम्हाला कसे समजेल बालकाला नेहमीपेक्षा पातळ शौच होत असेल किंवा पूर्णपणे पातळ शौच झाल्यावर बालकाला अतिसार झाला असे समजावे.जलशुष्कता म्हणजे काय तर शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे याची लक्षणे जर बालक चिडचिडे,अस्वस्थ झाले असेल,बाळाला भोवळ आली किंवा बेशुद्ध झाले,जर बालकाला खूप तहान लागत असेल किंवा ते पाणी पिऊ  शकत नसेलडोळे खोल गेले असेलहलका चिमटा काढल्यावर त्वचा अतिशय मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जात असेल (त्वचेच्या लवचिकतेचा अभाव).

          अतिसारामध्ये रुग्णांना जुलाब वांत्या चालू आहे पण जलशुष्कता नाही त्यांनी जलसंजीवनीचा वापर करावा तसेच पेज,सरबत इत्यादी घरगुती पेयांचा वापर करावा. जलशुष्कता असल्यास जलसंजीवनी व घरगुती पेय घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .

         तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास नजीकच्या प्रा आ केंद्र / ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्टेट सलाईन देण्यात यावे तीव्र जलशुष्कतेत रुग्णाला शिरेवाटे देण्यासाठी रिंगर लॅक्टेट हे सर्वाधिक योग्य द्रावण होय.

         अतिसार सुरु झाल्यावर तसेच प्रत्येक वेळी शौच झाल्यावर अतिसार संपेपर्यंत बालकाला जलसंजीवनी पाजत राहा अतिसारामध्ये जलसंजीवनी दिल्याने शरीरातील क्षार व महत्वाच्या पदार्थाची कमतरता भरून निघतेउलट्या आणि जुलाब होण्याचे प्रमाण कमी होते,शरीरातील पाण्याची पातळी राखते आणि अतिसारातून प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते .

         तसेच अतिसारामध्ये झिंक टॅबलेट दिल्याने अतिसाराचे प्रमाण आणि त्रीव्रता  कमी होते,अतिसारापासून ३ महिने संरक्षण मिळते,रोगप्रतिकारक शक्ती दीर्घ काळासाठी वाढवतेझिंक टॅबलेट मुळे अतिसाराचा कालावधी २५ टक्याने कमी होतो व उलटीचे प्रमाणही घटते.

         जलसंजीवनीचे द्रावण बनविल्यानंतर २४ तासाच्या आत वापर करा व त्या नंतर उरलेले द्रावण टाकून द्या.दिवसातून एकदा १४ दिवस वयोगटानुसार योग्य झिंक ची मात्रा द्यावी.

अतिसारासाठी प्रतिबंधात्मक उपाय -नेहमी शुद्ध पाणी पिणे,वैयक्तिक स्वच्छता पाळणेशौच वरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ करणे ,मानवी विष्टेची योग्य विल्हेवाटबालकांचे रोटा व गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे.