07 ते 16 मे, पासून ग्रिष्मकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 6 मे.पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी सुरु

07 ते 16 मे, पासून ग्रिष्मकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

6 मे.पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी सुरु

             भंडारा,दि.3 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे मार्फत 07 ते 16 मे, 2024 या कालावधीत ग्रिष्मकालीन  उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षण शिबीरामध्ये सॉफ्टबॉल या खेळांचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा सकाळी 06.00 ते 08.30 व सायंकाळी 05.00 ते 07.30 राहील.

        यामध्ये सॉफ्टबॉल या खेळांचे तज्ञांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणावा लागेल.देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे 8 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलीकरीता आयोजित करण्यात येत असून प्रशिक्षण पुर्ण करणा-या प्रशिक्षणार्थीना या कार्यालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

           या प्रशिक्षण शिबीरा निशुल्क असून याकरीता 06 में, 2024 पासून 04.00 ते 06.00 वा दरम्यान जिल्हा कीडा अधिकारी कार्यालयात नोदणी करण्यात येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना वरील पैकी कोणत्याही खेळाच प्रशिक्षण शिबीरात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी नियोजित वेळेस आपली नोंदणी करावी, प्रशिक्षणाकरिता खेळानुसार आवश्यक साहित्य, गणवेश स्वतःचा आणावा लागेल असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी कळविले आहे.