शेतकऱ्यांना योग्य व उत्तम गुणवत्तेचे बियाणे छापील किंमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करु नये,अशी बाब निदर्शनास आल्यास वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा

शेतकऱ्यांना योग्य व उत्तम गुणवत्तेचे बियाणे छापील किंमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करु नये,अशी बाब निदर्शनास आल्यास वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा

         भंडारा,दि.3 :शेतकन्यांना योग्य व उत्तम गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते य किटकनाशके पुरविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करीत असतांना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत संबंधित तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सर्व शेतकरी बंधुना मार्गदर्शन करतात परंतु सदरची माहिती शेतकरी बंधुना देखोल असायला पाहिजे हया हेतूने निविष्ठा खरेदी करतांना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते खालीलप्रमाणे आहे.

         बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी परवाना धारक बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे सिलबंद वेष्टनातोल खुण चिट्टी (लेबल) असलेले बियाणे खरेदी करावे, वेष्टनात सिलबंद नसलेले बियाणे दर्जाची खात्री नसल्याने ते खरेदी करू नये,खरेदी केलेल्या बियाणांबाबत संपूर्ण तपशिल असलेले उदा. पिक वाण, लेबल नंबर, वनज तपासणीचा दिनांक, वेध मुदत, बियाणे किमत, खरेदीदाराचे, उत्पादकाचे विक्रेत्याचे नाव तसेच विक्रेत्याचो सही (इ) रोखी अथवा उधारोची पावती घ्यावी.

         बियाणे खरेदी करतांना त्यावरील वेध मुदतीची खात्री करून वैध मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे छापील किमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करू नये अशी बाब निदर्शनास आल्यास वैधमापन शास्व विभागाचे निदर्शनास आणून दयावे.विशिष्ट संशोधित वाणाचा आग्रह न धरता त्याच गुणधर्माचे अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे शक्यतो खरेदी करावे.

        बियाणे खरेदी केल्यानंतर खरेदीची पावती, वेष्टन व त्यावरील लेबल व पिशवीतील योडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.बियाणे दर्जा उगवन क्षमता/ भोतिक शुध्दतेवाबत शंका आल्यास कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखानी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.

         रासायनिक खते खरेदी करतांना घ्यावयाची काळजी -रासायनिक खते खरेदी करतांना परवाना धारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे,रासायनिक खते खरेदी करतांना ई-पॉस मशिनव्दारेच खते खरेदी करावीत व तसा आग्रह कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना करावा,विक्रेत्याकडून खरेदी केल्यावर रासायनिक खताचे बिल पावतो मागून घ्यावो.

 खरेदी पावतीवर खताचे नाव, ग्रेड, किमत उत्पादकाचे नाव याचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे याची खात्री करूनच बिलावर सही करावी.

         खत खरेदी करतांना खताचे पोत्याच्या वजनाची खात्री करून घ्यावी. संशयास्पद, बनावट खत विक्री तसेच खताच्या कोणत्याही तक्रारीकरीता त्वरीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. कमाल किरकोळ विक्री किमतीच्या अत्यंत कमी अथवा जादा दराने विक्री होत असल्यास त्वरीत नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

          किटकनाशके खरेदी करतांना घ्यावयाची काळजी-किटकनाशके खरेदी करतांना परवाना धारक विक्रेत्याकडूनच घ्यावी.किटकनाशके खरेदी करतांना ती सिलबंद पॅकींगमध्ये असल्याची खात्री करून घ्यावी. किटकनाशके खरेदी करतांना केलेल्या किटकनाशकाची रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.किटकनाशके खरेदी करतांना खरेदी बिलावर किटकनाशकाचे नाव, उत्पादकाचे नाव, बेंच क्रमांक, वापराचा अंतिम दिनांक यांचा उल्लेख बिलावर असणे अत्यंत आवश्यक आहे. याची खात्री करूनच बिलावर स्वाक्षरी करावी.

      कमाल किरकोळ विक्री किमतीच्या अत्यंत कमी अथवा जादा दराने विक्री होत असल्यास त्वरीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा,संशयास्पद अथवा बनावट किटकनाशकांची विक्री निदर्शनास येताच त्वरीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. वरील प्रमाणे बियाणे, खते किटकनाशके खरेदी करतांना शेतक-यांनी काळजी घ्यावी,असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती संगीता माने व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद भंडारा  पी पी वानखेडे यांनी कळविले आहे.यांची शेतऱ्यांनी नेांद‍ घ्यावी,

         शेतक-यांना दर्जेदार बियाणे, खते, किटकनाशके पुरविणेकरीता जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर भरारी पथकाची नेमणुक करण्यात आलेली आहे. शेतक-यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा स्तरावर भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात आलेल आहे. खरीप हंगाम 2024 दिनांक 15 मे ते दिनांक 15 ऑगष्ट,2024

भ्रमणध्वनी क्रमांक – 7058217977 वेळ सकाळी 10.00 ते रात्री 7.00 अधिक माहितीकरीता जिल्हा जिल्हा परिषद, भंडारा, अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, संबंधित तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.