राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे १६ विद्यार्थी उत्तीर्ण
चंद्रपूर – ३० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असुन वर्ग ८वीच्या २४ विद्यार्थ्यांपैकी एकूण १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. सावित्रीबाई फुले शाळेतील २४ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते पैकी १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. मुलींमध्ये श्रुती मेश्राम,जास्मिन थुल,तेजस्विनी मिरेवाड,विद्या तावाडे,त्रिशा मेंढेकर,खुशी खोब्रागडे,मानश्वी गणवीर, ऋतुजा रायपल्ले,अनुष्का दुम्मेवार,जान्हवी दोडके तर मुलांमध्ये प्रथमेश साटोने,रुद्र कजले,वेदांत लोहटकर,सत्यम किरमे, प्रशिक बारसागडे,प्रयास कांबळे या विद्यार्थ्यांनी हे सुयश मिळविले आहे.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल,अति.आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांचे मार्गदर्शनात मनपा शाळा यशाचे नवीन टप्पे गाठत असुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत,वर्ग शिक्षक सचिन रामटेके, विषय शिक्षक अंबादे, मोहारे,सर्व शिक्षक वृंद तसेच आपल्या आई वडीलांना दिले आहे.