शासकीय व  अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचा  शुभारंभ

शासकीय व  अनुदानित आश्रम शाळेच्या

विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचा  शुभारंभ

चंद्रपूर : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीने शासकीय आश्रम शाळा बोर्डा येथे उन्हाळी शिबाराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम  पार पडला.  यावेळी अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार,  तर विशेष अतिथी म्हणून विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे उपस्थित होते.

         सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशांत खाडे यांनी उन्हाळी शिबीर पहिल्यांदाच या प्रकल्पात राबवित असल्याने या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे विभागांतील सर्व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास वाढविण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा कोषागार अधिकारी श्री.पवार यांनी प्रकल्प कार्यालयाचे आभार मानत अशा प्रकारचे शिबीर सर्वत्र राबविले जावे, जेणेकरुन आदिवासी विद्यार्थी हा समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकेल, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस. बोंगिरवार सहा.प्रकल्प अधिकारी यांनी केले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी.के. टिंगुसले, जी.एम. पोळ, आर.एस. बोंगिरवार, आर.टी. धोटकर, वाय.आर.चव्हाण, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी.कुळसंगे, एम.डी गिरडकर, एस.डी.श्रीरामे, पी.बी. कुत्तरमारे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम, शासकीय/माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.