सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, देसाईगंज यांचे अध्यक्षतेखाली नगरपरीषद, देसाईगंज येथे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व उमेदचे महिला कार्यकर्त्या सभा संपन्न
गडचिरोली,दि.06 : देसाईगंज – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघा अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाची जगजागृती करणे करीता नगरपरीषद, देसाईगंज यांचे सभागृहात दिनांक 03 एप्रिल 2024 रोजी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, देसाईगंज श्रीमती मानसी (भा.प्र.से.) यांचे अध्यक्षतेखाली नगरपरीषद, देसाईगंज यांचे सभागृहात देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व उमेद चे महिला कार्यकर्त्या यांची सभा घेण्यात आली. सदर सभेला तहसिलदार, देसाईगंज ह्यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मार्गदर्शन केले. तसेच, मतदारांमध्ये मतदानाविषयी आवड तयार करून स्त्रियांनी विशेष करून जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याकरीता व आपल्या मतदानाचा विशेष हक्क बजावण्याकरीता त्यांच्यात व गावातील प्रत्येक स्त्रियांमध्ये मतदानाची जनजागृती करणेकरीता स्त्रियांसाठी स्पर्धात्म उपक्रम राबविणे उदा. रांगोळी स्पर्धा घेणे, भजन स्पर्धा घेणे इत्यादी स्पर्धा घेवुन मतदानाची जनजागृती करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तालुक्यातील 5 उत्कृष्ठ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमांना प्रमाणपत्र व बक्षिस देवुन प्रोत्साहित करण्यात येईल असे तहसिलदार, देसाईगंज व प्रणाली खोचरे गट विकास अधिकारी तथा नोडल अधिकारी SVEEP यांनी सांगीतले. सदरचे सभेकरीता प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणुन एन. जी. वाते ना. तह. कोरची तथा सहा. नोडल अधिकारी SVEEP, आनंद ठिकरे आरोग्य अधिकारी देसाईगंज, शितल लडके, बाल विकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज, विजय बरडे बि. एम. एम. तालुका अभियान देसाईगंज तसेच भारती उपाध्याय, तालुका समन्वयक मुक्तीपथ देसाईगंज इत्यादी उपस्थित होते. भारती उपाध्याय, तालुका समन्वयक मुक्तीपथ देसाईगंज यांनी आपल्या गावातील दारू बंद ठेवुन निपक्षपाती पणे मतदान करण्याकरीता महिलांना प्रोत्साहित केले व प्रत्येक गावात मतदान जागृती बाबत उपक्रम राबविणे करीता पथनाट्य व छोटेखानी प्रयोग करणेबाबत माहिती दिली.