रिपाई (आठवले)चे जयप्रकाश कांबळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
चंद्रपूर, ३१ मार्च : समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे, दीनदलित शोषित पीडिताना न्याय मिळावा, आयुष्यमान भारत सारख्या योजनांमधून गरिबांसाठी आरोग्य सुविधा सुलभ करून देणाऱ्या, कामगार आणि कष्टकऱ्यांचे जीवन सुसह्य करणाऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आंबेडकरी जनतेने आता पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन करून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन रिपाई (आठवले) चे चंद्रपूर जिल्ह्याचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष श्री. जयप्रकाश कांबळे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे येथे २८ मार्च रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निश्चय करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) चे केन्द्रीय अध्यक्ष मा.ना. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात देशभरातील आंबेडकरी जनता पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुढे सरसावली असून चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार भरघोस मतांनी विजयी व्हावा, चंद्रपूर जिल्ह्याला विकासामध्ये आघाडी घेऊन देणारे ज्येष्ठ नेते श्री सुधीर मुनगंटीवार यांना संसदेत पाठविण्याचा निश्चय करूया असे आवाहन देखील श्री कांबळे यांनी केले आहे. चंद्रपूरात झालेल्या बैठकीत श्री कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष केशव रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष राजु भगत, चंद्रपूर तालुका अध्यक्ष हंसराज वनकर, राजुरा तालुका अध्यक्ष ईश्वर देवगडे, वरोरा तालुकाध्यक्ष बंडू लमाने, भद्रावती तालुकाध्यक्ष विजय सपकाळ, चिमूर तालुकाध्यक्ष हेमंत भैसारे, नागभिड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष राजु मेश्राम, मुल तालुकाध्यक्ष करुणासागर देव, बल्लारपूर तालुकाध्यक्ष धर्मेश नागदेवते, बल्लारपूर शहर अध्यक्ष प्रविण डोर्लीकर, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष भारत अलोने, चंद्रपूर शहर संघटक बाळु आंबेकर, चंद्रपूर शहर महासचीव संदीप जंगम, शहर उपाध्यक्ष शैलेश राखडेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.