हत्तीरोग दुरीकरण मोहिम 26 मार्च पासून / एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम
भंडारा,दि.21 : हत्तीरोग हा एक सुतासारखा माइक्रोफायलेरिया कृमीमुळे होणारा रोग असून हयाचा प्रसार क्युलेक्स डासांच्या मादीमुळे होतो.क्युलेक्स डासांची मादी मणुष्याला चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन 8 ते 18 महिण्याच्या कालावधीत खालील लक्षणे दिसून येतात.लोकांना बाहय दृष्टीने जरी बरे वाटत असले तरी त्यांचे शरीरात हत्तीरोगाचे परजिवी जंतू असू शकतात.
हत्तीरोगाचे परजिवी जंतू यामुळे लसीकाग्रंथी लसिका वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा त्यांना इजा झाल्यास त्यातील लसीका द्रव अवयवांमधून नीट वाहू शकत नाही व तो शरीराच्या विशिष्ट भागामध्ये साचतो.उदा.हात/पाय जर हा अडथळा हत्तीरोगाच्या जंतूमुळे निर्माण झाला असेल तर त्यास हत्तीरोग असे म्हणतात.यात शरीरातील विविध अवयवांवर लसीका द्रव साचल्यामुळे सूज येते.उदा.वक्षस्थळे,पुरुष व स्त्री रुग्णाला खूप शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
हत्तीरोग म्हणजे काय
Ø लसिकेचा हत्तीरोग हत्तीपाय या नावाने ओळखला जातो.
Ø याची लागण सहसा खुप आधी झालेली असते.
Ø वर्षानुवर्षे याची लक्षणे दिसून येत नाहीत तथपि लसिका संस्थेत बिघाड होतो.
Ø लसिकेचा हत्तीरोग दोऱ्यासारखा,पूर्ण वाढ झालेल्या हत्तीरोगाच्या परोपजीवी मुळे होतो.असे पूर्ण वाढ झालेले जंतू नर व मादी लसिकांग्रंथीत राहतात व मादी जंतू लाखो लहान जंतूना जन्म देते ज्यास मायक्रोफायलेरीस म्हणतात.
Ø हे मायक्रोफालेरीस रात्रीच्या वेळी रुग्णांच्या रक्तप्रवाहात फिरत राहतात आणि नंतर डासाच्या चावण्याने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारीत होतात.प्राथमिक अवस्थेत या रोगाची लक्षणे दिसून येत नसल्याने मायक्रोफायलेरिया असणारी व्यक्ती ओळखता येत नाही आणि अशा व्यक्तीमुळे समाजात हत्तीरोगाचा डासामार्फत प्रसार चालू राहतो.
Ø रोगाची लागण झालेल्या व्यक्तीचे पाय सूजतात,लसिकाग्रंथ,लसिका वाहिनी प्रसरण पावतात आणि शेवटच्या टप्यात लसिका संस्था बिघडल्याने अंडवृध्दी होते.
Ø हत्तीरोगाची लागण झालेल्या व्यक्तीस वारंवार तीव्र लक्षणासह आजारपण
Ø येते यामध्ये ताप येणे व सूज आलेल्या शरीराचा भाग लालसर होऊन वेदना होणे अशी लक्षणे दिसून येतात.व अशा वेळोवेळी येणाऱ्या आजारपणानंतर हत्तीपायाची वाढ होते.
हत्तीरोगाचे लक्षणे :-
Ø अंगावर खाज येणे,पूरळ येणे,वारंवार ताप येणे,हातापायावर सुज येणे
Ø अंडवृध्दी होणे
Ø जननेंद्रयावर सूज येणे.
हत्तीरोगाचा प्रसार
हत्तीरोग हा डासांमुळे फैलावणारा रोग असून क्यूलेक्स डासांची मादी यांचा प्रसार करण्यास कारणीभूत असते.जंतू असलेली मादी चावल्यास प्रत्येक वेळेस संसर्ग होतोच असे नाही कारण हत्तीरोगाचे जंतू हे मादी मार्फत त्वचेवर सोडले जातात.त्यानंतर जंतूना स्वत:त्वचेवर जखम/छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करावे लागते.डासाच्या वारंवार चावल्यानंतर काही व्यक्तीनाच हत्तीरोगाची लागण होते.
हत्तीरोगाचा प्रादुर्भाव
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात 12 कोटी लोकांना या रोगाची लागण झालेली आहे.त्यापैकी 40 टक्के हत्तीरोग रुग्ण भारतातच आहेत.या रोगाने रुग्ण दगावत नसला तरी त्यास अत्यंतिक शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.हा रोग झाल्यावर बरा होत नसल्याने रंग्णांची त्यातून सुटका नसते.
विद्रुप अशी शारिरीक विकृती घेवू जगताना त्यांच्या मनात शरमेची भावना निर्माण होते.अंडवृध्दी मुळे पुरुषांच्या वैवाहिक जीवनांत अडथळा निर्माण होऊ शकतो.तसेच रुग्ण नेहमीप्रमाणे काम धंदा नीट न करु शकल्याने अर्थाजनातही बाधा येऊ शकते.पर्यायाने याचा परिणाम म्हणजे देशाच्या एकुण मनुष्यबळामध्ये घट होते.या सर्व बाबीचे गांभिर्य लक्षात घेवून राष्ट्रीय हत्तीरोग निर्मुलन कार्यक्रम हा 1955 पासून सुरु असून त्या अंतर्गत रात्र सर्वेक्षण करुन जंतू असलेले रुग्ण शोधने व त्यांना डी.ई.सी गोळयाचा उपचार देणे डासोत्पत्तीस्थानाचे नियंत्रण व निवडक डासोत्पत्ती स्थानावर अळीनाशकांची फवारणी व डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे.
हत्तीरोग दूरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्थ भागात एक दिवसीय डी.ई.सी .आयव्हरमेव्टीन व अल्बेंडाझोल गोळयांची सामुदायिक औषधोपचार मोहिम आय.डी.ए.राबवून देशातून हत्तीरोग दूरकरण करण्याचा संकल्प आहे.
सामुदायिक औषधोपचार मोहिमेतंर्गत लोकांनी 26 मार्च,2024 पासून डी.ई.सी.आयव्हरमेटीन,अल्बेंडाझोल गोळया का घ्याव्यात.
कोणत्याही व्यक्तीच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया जंतू असू शकतात.सुरुवातीच्या काळात कोणतीही बाहय लक्षणे वा चिन्हे दिसत नसल्याने असे लोक ओळखत येत नाही.
डी.ई.सी.व आयव्हरमेटीन गोळयांच्या सेवनामुळे रुग्णांचे शरीरातील मायक्रोफायलेरिया जंतू मरतात.रुग्णांचे रक्तातील मायक्रोफायलेरियाचा नायनाट झाल्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.
त्यामुळे समाजातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी डी.ई. सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळया घेतल्याच पाहिजेत.
डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयांच्या सामुदायिक सेवनामुळे समाजीतील हत्तीरोग जंतूभार कमी होऊन हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी मदत होईल व देशात समाजातील कोणत्याही नवीन व्यक्तीस हत्तीरोगाची बाधा होणार नाही.
डी. ई. सी. गोळया केव्हा घ्याव्यात.डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयाची फक्त एक मात्रा वर्षातून एकदाच म्हणजे राष्ट्रीय हत्तीरोग दिवशी घ्यावी.
डी. ई. सी. आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयाची एक मात्रा रुग्णांचे शरीरातील सर्व मायक्रोफायलेरियाचा नाश करते त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.त्यामुळे समाजातील सर्व पात्र लार्भार्थ्यांनी डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळया घेतल्याच पाहिजेत.
डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयांच्या सामुदायिक सेवनामुळे समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी होऊन हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी मदत होईल व देशात समाजातील कोणत्याही नवीन व्यक्तीस हत्तीरोगाची बाधा होणार नाही.
डी.ई.सी.गोळया केव्हा घ्याव्यात.डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदाच म्हणजे राष्ट्रीय हत्तीरोग दिवशी घ्यावी.
डी.ई.सी.आयव्हरमेटीन व आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयांची एक मात्रा रुग्णांचे शरीरातील सर्व मायक्रोफायलेरियाचा नाश करते त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.सामुदायिक औषधोपचार मोहिमेत 26 मार्च,2024 पासून या कालावधीत ज्या रुग्णांनी डी.ई.सी आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयाची एक मात्रा घेतली नाही त्यांनी पुढील 2 ते 5 दिवसात डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयाची एक मात्रा आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपलब्ध करुन सेवन करा.डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळया उपाशी पोटी घेवू नयेत.उपाशीपोटी गोळया घेतल्यास मळमळ,उलटी सारखा किरकोळ त्रास होऊ शकतो.म्हणून डी.ई.सी.गोळया काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्याव्यात.
हत्तीरोग टाळण्याकरिता नागरिकांनी काय करावे.
एक दिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहीम अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी 26 मार्च,2024 पासून डी.ई.सी.आयव्हरमेटीन व अल्बेंडाझोल गोळयाची एक मात्रा वयोगटानुसार सेवन करावी.डास चावणार नाही यासाठी मच्छरदाणीचा वापर,डासांना पिटाळून लावणाऱ्या उदबत्ती,रसायनाचा वापरद्वारे खिडक्यांना जाळी बसविणे हत्तीरोगाचा प्रसार क्यूलेक्स नावाच्या डासांमूळे होतो. हे डास साठलेल्या घाणपाण्यामध्ये अंडी घालून वाढतात.त्यामुळे घराभोवती डासोत्पत्ती स्थाने होऊ नयेत यांची काळजी घ्यावी.
हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत.गटारे वाहती करावीत व खड्डे बुजावेत सेप्टीक टॅकच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत व व्हेंट पाईपच्या वरच्या टोकाला जाळी बांधावी. झोपतांना किटक नाशक भारित मच्छरदाणीचा वापर कराव. घराच्या दारे व खिडक्यांना जाळया बसवाव्यात.