विविध क्षेत्रात कार्य करणा-या कर्तुत्ववार महिलांचा सत्कार
चंद्रपूर, दि. 14 : महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, असेस टू जस्टिस प्रकल्प, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नियोजन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, रुलर ॲन्ड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशनचे (रुदय) काशिनाथ देवगडे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, ब्रम्हपूरी येथील संरक्षण अधिकारी माधुरी भंडारे, जिल्हा महिला व बालकल्याण विभाागच्या संरक्षण अधिकारी कविता राठोड, वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासन कल्याणी राठोड, दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या लता वाडवे, जिवती येथील अंगणवाडी सुपरवायझर चंद्रकला उईके, पद्मापूर येथील अंगणवाडी सेविका अनुराधा साव, कल्पना राजुरकर यांना उत्कृष्ठ कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सी.एम.आर.सी. महिलांना, एकात्मिक सेवा योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचासुध्दा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले. संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.