जिल्हा वाळू सनियंत्रण समितीची बैठक संपन्न तीन लक्षहून अधिक ब्रास वाळू उपलब्ध
भंडारा, दि.13: राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर वाळू संनियंत्रण समितीचे गठन करण्यात आले. या समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता पराग ठमके, सर्व उपविभागीय सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. नवीन वाळू धोरणात दिलेल्या निर्देशानुसार सामान्य नागरिक, घरकुलधारक, शासकीय बांधकाम व इतर बांधकाम व्यावसायिक या सर्व घटकांना वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आलेली असून यावर्षी 3,30,767 ब्रास वाळूसाठा भंडारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले नवे वाळू धोरण ना नफा ना तोटा या तत्त्वावर असल्याकारणाने भंडारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 09 वाळू डेपो मधून वाळू विक्रीच्या किमती डेपो निहाय वेगवेगळ्या असतील.
तालुका डेपोचे नाव
- तालुका –लाखांदुर1. मोहरना – ₹ 1982/-
- खोलमारा – ₹ 1298/-
- आंतरगाव- ₹ 1124/-
- तालुका – मोहाडी 4. निलज बु. – ₹ 1617/-
- तालुका – पवनी 5. गुडेगाव – ₹ 1662/
- तालुका – भंडारा 6. बेलगाव – ₹ 1914/-
- तालुका- साकोली 07. परसोडी – ₹ 1073/-
- तालुका- लाखनी 08. वाकल – ₹ 1417/-
- पळसगाव – ₹ 1280/-
- या किमतीमध्ये स्वामित्वधन शुल्क (₹ 600 प्रती ब्रास), जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (स्वामित्वधनाच्या 10%), सिस्टीम इंटिग्रेशन चार्जेस (₹ 16.58 प्रति ब्रास) यांचा देखील समावेश आहे.
- सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाद्वारे महाखनिज प्रणालीवरून सामान्य नागरिकांना वाळूची नोंदणी सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. रोहन ठवरे यांनी दिली.