पेंशन अदालत आणि e-ppo संबंधी कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली, दि.29: गडचिरोली जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक यांना सुचित करण्यात येते की, महालेखाकार कार्यालय, नागपूर यांचे मार्फत दिनांक 05 मार्च 2024 ला जिल्हा नियोजन कार्यालय (जिल्हाधिकारी कार्यालय परिसर) गडचिरोलीचे सभागृहामध्ये सकाळी ठिक 11 वाजता पेंशन अदालत आणि e-ppo संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेत e-ppo बाबत तसेच निवृत्तवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन प्रकरणातील अडचणींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. करीता राज्य शासनाच्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे अप्पर कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.