राज्यस्तरीय रेड रिबिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत गडचिरोली तिस-या क्रमांकावर

राज्यस्तरीय रेड रिबिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा
स्पर्धेत गडचिरोली तिस-या क्रमांकावर

गडचिरोली, दि.25: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचे मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यासाठी युवा महोत्सव अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हास्तरीय रेड रिबिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या मध्ये १) श्रध्दा अशोकराव मांदाडे, नवजीवन पब्लीक स्कुल, वर्ग ८ वी, २) वेदांत पुरुषोत्तम भंडारे, वसंत विद्यालय गडचिरोली वर्ग ९ वी यांची गडचिरोली जिल्हयातुन महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्नमजुषा स्पर्धेत निवड झाली. त्यानुसार स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातुन दोन विद्यार्थीची एक टिम करून महाराष्ट्रातुन एकुण ३२ टिम ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य रेड रिबिन ऑनलाईन प्रश्नमर्जुषा स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्हयाने तिसरा क्रमांक मिळविले होते. गडचिरोली जिल्हयातुन १) श्रध्दा अशोकराव मांदाडे नवजीवन पब्लीक स्कुल, २) वेदांत पुरुषोत्तम भंडारे, वसंत विद्यालय गडचिरोली या दोन स्पर्धकांना प्रत्येकी बक्षीस रक्कम रु ३०००/- रोख पारितोषीक, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, क्लिनिकल सर्वीस ऑफिसर, डॉ. अभिषेक गव्हारे, सौ शितल नरेंद्र गौरकार नवजीवन पब्लीक स्कुल, सतिश धाईत वसंत विद्यालय, गडचिरोली उपस्थीत होते.