महाविकास आघाडीचा जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला पुढील बैठकीत अंतिम होईल विजय वडेट्टीवार यांची माहिती

महाविकास आघाडीचा जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला पुढील बैठकीत अंतिम होईल विजय वडेट्टीवार यांची माहिती

महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..
वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

मुंबई/नागपूर,१६
महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल. अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीत गेलेले घटकपक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. एकतर त्यांना गुलामगिरी करावी लागेल किंवा महायुतीतून बाहेर पडावे लागेल. महायुतीचा फॉर्म्यूला ठरला असला तरी ते जास्तीत जास्त जागा भाजपा स्वतःकडे ठेवणार आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे.