गडचिरोली शहरातील नगरीत भव्य कलक्षयात्रेसह, शोभायात्रा व विविध कार्यक्रमा संबंधित नियोजन बैठक.

गडचिरोली शहरातील नगरीत भव्य कलक्षयात्रेसह, शोभायात्रा व विविध कार्यक्रमा संबंधित नियोजन बैठक.

खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात श्री.साई मंदिर येथे बैठकीचे आयोजन

गडचिरोली:- भगवान प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्याला मुर्ती प्राण प्रतिष्ठा येत्या २२ जानेवारी ला श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना गडचिरोली शहरातदेखील तयारीला लागला असून या कार्यक्रमांद्वारे गडचिरोली रामभक्त नागरिक प्रभू श्रीरामाची आराधना करणार आहेत.या निमित्ताने गडचिरोली शहरातील नगरित मोठया आनंदाने,उत्साहाने,भव्य दिव्य सोहळा जल्लोषात दिवाळी सारखा साजरा व्हावा.यासाठी श्री साई मंदिर चामोर्शी रोड, गडचिरोली या ठिकाणी नियोजनात्मक बैठकीचे आयोजन खासदार अशोक नेते याच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

गडचिरोली शहरातील विविध ठिकाणाहून कलश यात्रेसह,भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात यावी. या निमित्ताने भगवान प्रभू श्रीरामाचे पूजन,भजन,कीर्तन,व महाप्रसाद असे विविध प्रकारचे कार्यक्रम गडचिरोली शहरात होणार याकरिता नियोजन बैठक घेण्यात आली.

यावेळी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चा चे अशोक नेते सोबत आमदार डॉ. देवराव होळी,जिल्हा संघ चालक घिशुलांलजी काबरा,भाजपा
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जंब्बेवार,सामाजिक नेते रामायणजी खटी,विजय शृंगारपवार,तसेच पदाधिकारी व मोठया संख्येने शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक महिला उपस्थित होत्या.