अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी सबळ पुराव्यासह लेखी अर्ज सादर करा
भंडारा,दि.3 : जिल्हा परिषद,भंडारा अंतर्गत सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्यांना,कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याकरिता सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,भंडारा या कार्यालयास अर्ज केलेल्या उमेदवारांनी उपलब्ध करुन दिलेली कागदपत्रे,प्रमाणपत्र व इतर माहितीच्या आधारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेकरिता नोंदणी रजिष्टरवर नोंदणी केलेली आहे.
तसेच प्राप्त अर्जाची छाननी-तपासणी करुन यादी तयार करण्यात आलेली आसून यादी www.bhandara.gov.in व www.bhandarazp.org या संकेतस्थ्ळावर प्रसिध्दी करण्यात आली. तसेच एक प्रत जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
या संबधित अनुकंपा उमेदवारांनी उक्त यादी तपासून घेवून माहितीत दुरुस्ती करणे व काही आक्षेप असल्यास सबळ पुराव्यासह लेखी अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद,भंडारा यांचे नांवाने 16 जानेवारी,2024 पर्यत अर्ज सादर करावा.
त्यानुसार आवश्यक ती सुधारणा व कार्यवाही करण्यात येईल.विहीत मुदतीत कोणत्याही प्रकारचे आक्षेप न झाल्यास ही यादी अंतिम करण्यात येईल.व याबाबत कोणतीही उजरतक्रार ऐकली जाणार नाही.यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी,असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद,भंडारा यांनी कळविले आहे.