चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उदघाटन संपन्न
गडचिरोली, दि.27: राज्यातील सर्व मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार मुलांमधील सुप्त गुणाना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांबाबत बंधुभाव, साघीक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी जिल्हामध्ये चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला मुलींमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघीक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यातील कला व सुप्त गुणाना वाव मिळुन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दुष्टीने जिल्हयास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव व क्रिडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान अहिल्यादेवी बाल सदन घोट येथे तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज चाचा नेहरु बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धाचे उदघाटन आर. आर. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्ष अरुण फेगडे पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन, गडचिरोली व प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती रुपाली दुधबावरे संरपंच ग्रामपंचायत घोट, वर्षा मनवर अध्यक्ष बाल कल्याण समीती, गडचिरोली प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गडचिरोली, श्रीमती शायनीक गर्वासीस अध्यक्ष लोकमंगल संस्था घोट, श्रीमती मर्लीण पारेकाळण संस्थेचे सचिव, विनोद पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी, अविनाश गुरनुले जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गडचिरोली, विलास ढोरे परिविक्षा अधिकारी, विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्येकत्ये जयंत जथाडे व प्रास्ताविक प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले तर आभार विनोद पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी यांनी मानले. आज अहिल्यादेवी बालगृह घोट व पं.पु. महात्मा गांधी विदयालय घोट या संघातील उदघाटनिय सामन्याचे फीत कापुन क्रिडास्पर्धाची सुरुवात करण्यात आली. सदर बाल महोत्सवात शासकीय संस्था व स्वयंमसेवी संस्थेमधील प्रवेशित मुली व स्थानिक शाळा १) नवोदय मराठी उच्च प्रा.तथा हाय. २) प.पुज्य महात्मा गांधी विदयाल घोट, ३) केंद्रिय नवोदय विदयालय घोट ४) जिल्हा परिषद महात्मा गांधी विदयालय/कनिष्ठ महाविदयाल घोट तसेच ५.) अहिल्यादेवी बालगृह घोट येथिल प्रवेशित अशा एकुण विविध स्पर्धेमध्ये २६४ बालके स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (कब्बडी, १०० मीटर धावणे, निबंध, रागोंळी, चित्रकला, सामान्य ज्ञान स्पर्धा,एकल नृत्य, सामुहिक नृत्य इ. सास्कृतिक इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.