गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांना तेलघाणा उद्योगास चालना
गडचिरोली, दि.07: महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना “या सदरा खाली शेतकऱ्यांच्या सोयी करीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जा व्दारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यत एकात्मिक प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्याच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असुन शेतकऱ्यांनी तेलघाणा प्रक्रिया युनिट करावयाचा आहे. तेलघाणा प्रक्रिया युनिट करिता अर्थसहाय्य उद्देश – तेलघाणा उद्योगास चालना, पात्रता / लाभार्थी : शेतकरी उत्पादक कंपनी / वैयक्तीक लाभार्थी (सर्व तालुका),अनुदान निकष : – किमतीच्या ५० टक्के किंवा रु.२.०० लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. विनियोग कार्यपद्धती उत्पादित मालाच्या मूल्य वृद्धीसाठी छोटे तेलघाणे संयंत्र या बाबीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. छोटे तेलघाणा सयंत्रासाठी कृषियांत्रिकीकरण उप अभियान (SMAM) अंतर्गत घटक क्रमांक ३ बाबीखाली नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार CIPHET,लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill / Oil Expeller ची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. तरी, इच्छुक व पात्र शेतकर्यांनी MAHADBT पोर्टल वर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावे. बसवराज भी. मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.