जमिन हक्काबाबतचे दावे दाखल करता येतील :-उपविभागीय अधिकारी
भंडारा,दि.5 : जिल्ह्ययातील वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 19 ते 25 चे अधिकार उपविभागीय अधिकारी,यांना शासनाकडून दिलेले असून,त्या अधिकारानुसार त्यांनी उमरेड व पवनी-कऱ्हांडला विस्तारीत अभयारण्यात येणाऱ्या जिल्हयातील व ‘क्षेत्रातील जमिनीमध्ये उक्त अधिनियमाचे कलम 21 ब नुसार, उमरेड, पवनी, कऱ्हांडला विस्तारीत वन्यजीव अभयारण्याचे एकुण क्षेत्र 636.86 हेक्टर किंवा 6.3686 चौ.कि.मी.या जमिनीवर नागरिकांचे असलेल्या हक्काबाबतचे दावे सांगणाऱ्या व्यक्तीनी,उपविभागीय अधिकारी, यांना प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्याचे संबंधाने 2 महिन्याचे आत अशा व्यक्तीनी, विहीत नमुन्यात त्यांचे हक्काचे स्वरुप व व्याप्ती तसेच मोबदल्याबाबत तपशिलासह उपविभागीय अधिकारी,यांचे कार्यालयात दावे दाखल करता येतील.असे उपविभागीय अधिकारी,यांचे जाहीरनामा क्रमांक क्र.उविअ/ अका/ उपक/ वन्यजीव/ कावि/ 320/2023 दिनांक 1 सप्टेबर 2023 नुसार कळविले आहे.या संबंधित अधिक माहिती उपवनसंरक्षण वन विभाग, भंडारा येथे सुध्दा उपलब्ध आहे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी, गजेंद्र बालपांडे यांनी कळविले आहे.