बल्लारपुरचे गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके सन्मानीत

बल्लारपुरचे गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके सन्मानीत

चंद्रपुर  दिनांक – 28/08/2023 बल्लारपुर तालुक्यातील सर्व गावे उदयमान घटकात हागणदारी मुक्त अधिक घोषीत केल्या मुळे नुकताच  बल्लारपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके यांना स्वच्छ भारत मिशनचे राज्याचे अभियान संचालक शेखर रौदळ व उपआयुक्त (विकास) कमलकिशोर फ़ुटाणे यांच्या शुभ हस्ते नागपुर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावासभेत सन्मानीत करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशनचे महाराष्ट्राचे अभियान संचालक शेखर रौदळ विदर्भ दौ-यावर असतांना नागपुर येथे नुकताच नागपुर विभागातील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) व सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. बल्लारपुर तालुका विदर्भातील सर्व प्रथम हागणदारी मुक्त अधिक घोषीत करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)टप्पा 2 मध्ये हागणदारी मुक्त अधिक करतांना उदिमान, उज्वल व उत्कृष्ट या तीन घटकामध्ये घोषीत केल्या जात असुन, बल्लारपुर तालुक्यात 17 ग्रामपंचायती असुन, 26 गावे या तालुक्यामध्ये आहेत. यापैकी 10 गावे उत्कृष्ट या घटकातुन हागणदारी मुक्त अधिक म्हणुन घोषीत करण्यात आली तर, 16 गावे उदिमान या घटकातुन हागणदारी मुक्त अधिक म्हणुन घोषीत करण्यात आली. त्यामुळे नागपुर येथिल आढावा सभेत बल्लारपुर पंचायत समिती अतंर्गत केलेल्या चांगल्या कामगीरी बद्दल गटविकास अधिकारी  अनिरुध्द वाळके यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी उपआयुक्त विपुल जाधव, चंद्रपुर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत, नागपुर विभागातील इतर जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता), सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मुबंईचे सनियंत्रण व मुल्याकंन सल्लागार सुजाता सामंत, माहीती शिक्षण सवांद सल्लागार आशिष थोरात, चंद्रपुर सनियंत्रण व मुल्याकंन सल्लागार   उपस्थित होते.