निर्यातदारासाठी कार्यशाळा संपन्न
भंडारा, दि.22 : जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील नियोजन भवन येथे डी.जी.एफ.टी च्या वतीने निर्यातवाढी संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रतीक गजभीये यांनी आयात-निर्यातदार नोंदणी तसेच निर्यात योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, डीजीएफटीचे सादरीकरण (presentation) सोपे आणि विशेषत: नवीन निर्यातदारांसाठी केंद्रित आहे. स्थानिक उद्योजकांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. डी.जी.एफ.टी च्या अधिकाऱ्यांनी डी.जी.एफ.टी. नागपूरच्या व्हि.सी. लिंक बद्दल देखील सांगितले .ज्याद्वारे निर्यातदारांना आणि नवीन उद्योजकांना येणाऱ्या प्रश्नांचे थेट डी.जी.एफ.टी. द्वारे निराकरण केले जाऊ शकते. स्थानिक निर्यातदारांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि भविष्यातही अश्या कार्यशाळा होणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.
अतिरिक्त संचालक डीजीएफटी, नागपूर कार्यालयाचे अधिकारी यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्याला पहिल्यांदा भेट देत असून भंडारा जिल्ह्याच्या अनोख्या संस्कृतीला चालना देण्यासाठी निर्यात म्हणून करण्यात यावे, म्हणून डीजीएफटी नागपूर या Export Outreach कार्यक्रमाचे माध्यमातून जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात म्हणून चालना देत आहे. याकरीता डीजीएफटी, नागपूर ने
जिल्ह्यात जास्तीत जास्त निर्यात व्हावे या उद्देशाने डीजीएफटी, नागपूर ने या कार्यशाळोचे आयोजन केले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचणकर यांनी आपल्या आधीक्षकीय भाषणामध्ये भंडारा जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीमध्ये वाटा कमी असून तो वाढवण्याकरीता सर्वोतोपरि प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी निर्यातीबाबत येत असलेल्या अडचणी विषयी डी.जी.एफ.टी च्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.भंडारा जिल्ह्याचे प्रमुख निर्यातदार श्री. पंकज सारडा यांनी उपस्थितांना यशस्वी निर्यातदार होण्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील निर्यातवाढी संदर्भातील ह्या कार्यशाळेत नाबार्ड , बँक ऑफ महाराष्ट्र, पोष्ट ऑफीस, Indian chamber of International and Business(ICIB), प्रकल्प संचालक आत्मा ,कौशल्य विकास विभाग,कृषी विभाग,वन विभाग,MSME, उद्योग विभाग, नियोजन विभाग, मावीम इत्यादि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.संबधित विभागांनी निर्यातीबाबत त्यांचे विभाग करत असलेल्या कार्याबद्दल व योजनबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, महिला बचत गट, निर्यातदार, राईस मिल क्लस्टर, हळद क्लस्टर आणि लाख क्लस्टर चे प्रतिनिधि यांची प्रामुख्याने उपस्थित होती . तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. एच. के. बदर व अधिकारी कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मोरई यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रतीक गजभीये यांनी केले.