अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वस्त्तिगृहात ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
भंडारा, दि. 14: तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या करिता आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया करिता https://swayam.mahaoline.gov.in या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही वसतीगृह प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज केलेले नाही.त्यांनी तात्काळ संकेतस्थळावर अर्ज सादर करावे,अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृह गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालय, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागानी कळविले आहे.