शासकीय औ.प्र. संस्था पवनी येथे जागतीक महिला दिन कार्यक्रम संपन्न

शासकीय औ.प्र. संस्था पवनी येथे जागतीक महिला दिन कार्यक्रम संपन्न

 

भंडारा दि. 15: शासकीय औ.प्र.संस्था पवनी या संस्थेमध्ये जागतीक महिला दिन कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला. कार्यक्रमा प्रसंगी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथींनी सर्व रांगोळ्यांचे परिक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड केली.

 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्रभारी गटनिदेशक विजयकुमार घडोले तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सरोजीनी डोंगरे, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय पवनी श्रीमती सुमित्रा साखरकर, पोलीस सब इन्स्पेक्टर चित्रा चांदुरकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.बलखंडे व वैद्यकीय अधिकारी योगेश रामटेके उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख अतिथी व अध्यक्षंनी कार्यक्रमास उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना समयोचीत मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी सेजल चाचेरे यांनी याप्रसंगी भाषण दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षणार्थी रूतीका बावनकर तर प्रास्ताविक शिल्पनिदेशक भंडारे व आभार प्रदर्शन किशोर शेंडे यांनी केले.