गायमुख व प्रतापगढ यात्रेकरिता जादा बसेस

गायमुख व प्रतापगढ यात्रेकरिता जादा बसेस

 

भंडारा, दि. 16 : दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री यात्रा निमित्त गायमुख, प्रतापगड येथे दरवर्षी प्रमाणे यात्रा भरत असते. या यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य पारिवहन महामंडळाच्या भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी आगारामार्फत जादा बसेस गायमुख व प्रतापगढ यात्रेकरिता सोडण्यात येणार आहे.

 

बसस्थानकावर 30 पेक्षा जास्त भावीक यात्रेकरिता राहिल्यास ग्रुप बुकिंग सुविधा देण्यात येईल.तरी भाविकांनी यात्रेकरिता लावण्यात येणाऱ्या बसेसचा वापर करावा व सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रा.प.भंडारा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.