महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पॅकेज घोषित करा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची मागणी
मुंबई।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी उत्तम रित्या काम करीत आहे.पंरतु, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे महागाई वाढली आहे.या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटील आला आहे.या संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी आणि बाजारात भांडवल खेळते ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किमान १० ते २० लाख कोटींचे पॅकेज महागाई नियंत्रणात आणण्यासाठी घोषित करावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधींचा विकास निधी खर्च केला जातो.याच निधीतून अनेक प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी वाढवण्याकडे मोदी सरकारचा कल आहे.सरकार यासोबतच या एकूण निधीपैकी किमान १०% निधी महागाई,दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी पॅकेज स्वरुपात घोषित करावी, अशी इंडिया अगेन्स्ट करप्शनची भूमिका असल्याचे पाटील म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी दरवाढीमुळे इंधन महागले आहे.केंद्राच्या अनेक प्रयत्नानंतर इंधनाचे दर किरकोळ प्रमाणात का होईना कमी झाले आहेत.पंरतु, तरी देखील पेट्रोल-डिझले महागल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. विविध करात कपात करून मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण कमी केला आहे.पंरतु, या सर्व बाबींचा म्हणावा तेवढा प्रभाव पडत नसल्याचे मत जाणकारांचे आहे. महागाई आटोक्यात आणणे, सर्वसामान्यांना अनुदान तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करणे हे त्रिसुत्री धोरण केंद्र सरकारला स्वीकारावे लागेल.
कॉंग्रेसच्या काळात देखील वाढत्या महागाईने जनता हैराण होती.पंरतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विश्वास आहे. मोठ्या संयमाने ते मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आहेत. भविष्यातही मोदींच्या नेतृत्वातच भाजप केंद्रात सत्तेवर येणार आहे, यात दुमत नाही. पंरतु, सर्वसामान्यांना मोठ्याप्रमाणात दिलासा अनुदान रुपाने केंद्र सरकारला द्यावा लागेल आणि हीच काळाची गरज असल्याचे पाटील म्हणाले.