जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे विविध खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
चंद्रपूर दि. 20 एप्रिल: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्या वतीने खेळाडूंकरीता 20 एप्रिल 2022 पासून विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षण शिाबिर आयोजित करण्यात येत आहे. जिल्हा स्टेडियम, आकाशवाणी रोड, चंद्रपूर येथे सकाळ व सायंकाळच्या सत्रामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सदर प्रशिक्षण शिबिरात 8 ते 17 वर्षाखालील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.
यात कराटे, बॅडमिंटन, बास्केटबॉल या खेळाचे प्रशिक्षण तसेच 8 ते 14 वर्षाखालील खेळाडूंना प्राथमिक विकास कौशल्याचे धडे तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येणार आहे. शिबिरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी शिबिरामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.