चैत्र पौर्णिमेनिमित्त चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा सुरू असून, आज 10 एप्रिल रोजी रामनवमी निमित्त महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि अधिकाऱ्यांनी व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान, महापौरांनी मंदिरात दर्शनासाठी जावून देवीची ओटी भरली.
माता महाकालीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातून आलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्याची पाहणी आज करण्यात आली. महापौर, आयुक्त उपमहापौर यांनी भाविकांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. भोजन, निवास आणि दर्शन रांगेत जावून पाहणी केली. दरम्यान, भाविकांच्या आरोग्यासाठी मनपाच्या वतीने आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या प्रसंगी झोन सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक सर्वश्री संजय कंचर्लावार, नंदू नगरकर, कल्पना लहामगे, मंगला आखरे, कल्पना बगुलकर, मनपाचे झोन सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.